Prajakta Padgaonkar

सण आणि सणाचे औचित्य

सण आणि सणाचे औचित्य साधून साजरे करायचे क्षण…प्रत्येक सण हा केवळ आजचा उत्सव नसून मागच्या सर्व वर्षांच्या स्मृतींचे एक अनोखे संचित देखील असतो!लहानपणी त्या सणातले नेमके काय आवडले होते, त्याच्या स्मृती तयार होतात, नव्या वस्त्रांचे, जरतर तलम पोतींचे असेच विलक्षण धागे गुंफले जातात आणि प्रत्येक नव्या वर्षी ते सगळे सगळे आठवत राहते, आठवांचा तो सुवास;… Continue reading सण आणि सणाचे औचित्य

मौन आणि शांतता

मौनात जे सौन्दर्य आहे, जे उपजत असे सृजन आहे त्यापासून शहरी माणूस हा सदैव वंचित राहिलेला आहे. मौन हे केवळ काहीतरी आलंकारिक, काही करून बघावे असे किंवा एखाद नव्या छंदाचे साधन नसून मौन हे पुष्कळ आदिम आणि मूलभूत असे आहे.